Ad will apear here
Next
‘थँक्सवाली आरती’चा अनोखा उपक्रम
‘थँक्सवाली आरती’ करताना राजस सोसायटीमधील सभासद व सेवाकर्ते.पुणे : आपला प्रत्येक सण विनाव्यत्यय साजरा व्हावा यासाठी आपल्या घरातील सण बाजूला ठेवून जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असणारे पोलीस, डॉक्टर, पोस्टमन, भाजीवाले यांच्यासाठी कसबा पेठेतील राजस सोसायटीने गेल्या वर्षीपासून ‘थँक्सवाली आरती’ हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे.

गणपती बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंत शहरात दर्शनासाठी आलेल्या गणेशभक्तांच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी पोलीस अहोरात्र तैनात असतात. बंदोबस्तावर असताना पोलिसांचे स्वत:च्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होते. त्याचबरोबर आपली महत्त्वाची कागदपत्र आणणारे पोस्टमन, पेपरवाले, कचरावाले, भाजीवाले, सुतार, इलेक्ट्रिशियन असे वेगवेगळे कर्मचारी आपला सण-उत्सव बाजूला ठेवून आपल्या मदतीला येतात.

या लोकांनाही या कालावधीत उत्सवाचा आनंद घेता यावा, याच उद्देशाने कसबा पेठेतील राजस सोसायटीतर्फे ‘थँक्सवाली आरती’ हा उपक्रम राबवला जात आहे. यात या सर्व कर्मचाऱ्यांकडून बाप्पाची आरती केली जाते. तसेच सर्वांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कारदेखील करण्यात येतो. या वर्षी त्याचा श्रीगणेशा करण्याच्या हेतूने २९ ऑगस्टला बाप्पाची आरती पासलकर गॅस एजन्सीचे कर्मचारी सुनील राऊत, परकास वाटकर, पेपरवाले अतुल मंचरकर, राजू व दूधवाले शांतवीर यांचा हस्ते करण्यात आली.

या वेळी ‘९५ बिग एफएम’चे रेडीओ जॉकी ज्योनिता, सानिका व नवीन, राजस सोसायटीचे श्यामसुंदर मुंदडा, मनमोहन मंत्री, विशाल रानपुरा, शुभम मुंदडा, सचिन राठी, राहुल मारूलकर, हरेश मांडलिया, पीयूष सोनी, मुकेश मुंदडा, सुमित झंवर आदी उपस्थित होते.

‘येत्या दिवसांत पोस्टमन व पोलिसांच्या हस्ते आरती केली जाणार आहे. आपणही हा उपक्रम आपल्या सोसायटीत सार्वजनिक मंडळात अवश्य राबवावा, जेणेकरून निदान एवढा तरी त्यांचा उत्सवात सहभाग असेल,’ असे आवाहन सोसायटीचे अध्यक्ष महेश रटकलकर यांनी केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZZMBG
Similar Posts
ॲड. जगताप यांची सार्वजनिक गणेश मंडळांना भेट पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाचे औचित्य साधून उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक ॲड. प्रसन्न जगताप यांनी बिबवेवाडी, डॉल्फिन चौक, धनकवडी येथील गणेश मंडळांना सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्या समवेत सहकारी मोहन इंडे, कल्पना उणवणे, राधिका मखामले, रमेश दौंडकर पाटील, सुनील मोहिते, राहुल रूपदे यांसह मंडळाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते
कसबा संस्कार केंद्रातर्फे मुलांसाठी संस्कार वर्ग पुणे : 'श्रुतिसागर आश्रम, फुलगाव संचलित कसबा संस्कार केंद्राच्यावतीने मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी वर्षभर दर रविवारी संस्कार वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. हे वर्ग कसबा पेठेतील शिंपी आळी येथील श्री संत नामदेव शिंपी दैव मंदिर सभागृह येथे सकाळी ८.३० ते १० या वेळेत होतील,' अशी माहिती संस्कार वर्गाचे संचालक अनिल दिवाणजी यांनी दिली
‘यंदा 'डीजे' प्रथेचे विसर्जन करा’ येत्या २५ ऑगस्टला गणपती येताहेत. आपापल्या घरी सुंदर आरास करून त्यात आपल्या लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना आणि विघ्नहर्त्याची सेवा आपण करणार. परंतु, गेली ४० वर्षे सामाजिक जीवनात काम करत असताना मला एक खंत जाणवते. जेवढे उत्साही आणि मंगलमय वातावरण घरच्या गणपतीला असते, तेवढेच मंगलमय वातावरण सार्वजनिक उत्सवात
पुणे येथे पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा २०१८ पुणे : माय अर्थ फाउंडेशन, सिंहगड युवा फाउंडेशन आणि शिवोदय मित्रमंडळ त्यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पर्यावरण देखावा व घरगुती गणेशोत्सव पर्यावरण देखावा स्पर्धा २०१८ आयोजित करण्यात आली असल्याची माहिती ‘माय अर्थ’चे अध्यक्ष अनंत घरत यांनी दिली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language